
सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील एकूण 63 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहातील 94 कैद्यांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यातील 63 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यात तीन महिला आणि 60 पुरुष कैद्यांचा समावेश आहे.
सांगलीचे जिल्हा कारागृह क्षमतेपेक्षा अधिक भरलेले आहे. सध्या न्यायालयीन कामकाज बंद असल्याने जामीनाची प्रक्रिया ही थांबलेली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन हजाराच्या पुढे गेली आहे तर 1641 रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. रविवारी एका दिवसात 268 रूग्ण महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत रोज ही संख्या दोनशे ते तीनशे या दरम्यान असल्याने महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन चक्रावून गेले आहे.

























































