
स्मार्टफोनचा वाढता वापर आणि स्कस्तात उपलब्ध असलेले डेटा प्लॅन यामुळे इंटरनेटकर ऑनलाईन कार्यक्रम पाहणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. खाद्य, मनोरंजन आणि शैक्षणिक विषयावरील कार्यक्रम युजर्स स्थानिक भाषेत पाहणे पसंत करतात, अशी माहिती वाॅटकन्सल्टने केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे.
ऑनलाईन व्हिडियो पाहणाऱया युजर्सच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. बहुतांश हिंदुस्थानींचे किमान दोन भाषांवर प्रभुत्व असल्याने स्थानिक भाषेतील व्हिडीयोद्वारे माहिती मिळवणे त्यांना सोपे जात असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. एक चतुर्थांशाहून अधिक युजर्सना स्थानिक भाषेतील मीम्स, इमेजेस पाहायला आकडतात. तर गॅजेट्स, फॅशन आणि स्पोर्ट विषयावरील कार्यक्रम पाहण्यासाठी युजर्सची पसंती प्रादेशिक भाषेपेक्षा इंग्रजीला असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे.
यू टय़ूब आघाडीकर !
सध्या मनोरंजनाचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध असले तरी यू टय़ूबची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ऑनलाईन व्हिडियो पाहण्यासाठी युटय़ूबला सर्वाधिक पसंती असून त्याखालोखाल हॉटस्टार आणि जिओटिव्हीवर व्हिडियो पाहिले जातात, असे अहवालात म्हटले आहे. 57 टक्के युजर्स हे दिवसातून अनेकदा ऑनलाईन व्हिडियो पाहतात. तर प्रादेशिक भाषेतून कार्यक्रम पाहणाऱयांची संख्या डिसेंबरपर्यंत 70 टक्के टक्क्यांवर पोहोचेल, असे भावितही वाॅटकन्सल्टने वर्तवले आहे.





























































