बिहार : मुख्यमंत्र्यांनी पुलाचे उद्घाटन करण्याआधीच रस्ता तुटला, आरजेडीने हाणला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bihar-road

बिहारमध्ये पुलाकडे जाणारा अ‍ॅप्रोच रोड तुटल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते उद्घाटनाच्या अगोदर मेगा ब्रिजकडे जाणारा अ‍ॅप्रोच रस्ता तुटला आहे. छपरा येथील बंगरा घाट महासेतुचा अ‍ॅप्रोच रस्ता  पावसात तुटला आहे, ज्यामुळे बिहार सरकारवर टीकेची झोड उठली. दरम्यान, या पुलाची किंमत 509 कोटी आहे आणि मुख्यमंत्री आज त्याचे उद्घाटन करणार आहेत.

वैकुंठपूरमधील सारण धरण फुटल्यामुळे बांगडा घाट महासेतुचा अॅप्रोच रस्ता तुटला असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या गोपाळगंज पुलाच्या प्रकरणाची आठवण करून देत राष्ट्रीय जनता दलाने नितीशकुमार सरकारला टोला हाणला आहे. आरजेडीने ट्विट केले की, ‘गोपाळगंजचा पूल मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनानंतर तुटला. आता भाजप-जेडीयूचे लोक म्हणतील की इथे पूल नाही तर अॅप्रोच रस्ता तुटलेला आहे, जसा काही तो विरोधी पक्षाने बनवला होता. तरी देखील मुख्यमंत्री उद्घाटन करतील कारण सध्या कोणत्याही नवीन, जुन्या, जीर्ण, तुटलेल्या वस्तूंचे उद्घाटन करण्याचा त्यांचा हेतू आहे!’

सर आली धावून, 264 कोटींचा पूल गेला वाहून; बिहार मधला धक्कादायक प्रकार