चालत्या बसला अचानक लागली आग, झोपेत असलेल्या 5 जणांचा कोळसा; 27 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली. एका खासगी बसला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला, तर 27 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

चित्रपुर जिल्ह्यातील हिरीयुर भागात मंगळवारी मध्यरात्री चालत्या बसला भीषण आग लागली. नॅशनल हाय वे नंबर 4 वर ही भीषण दुर्घटना घडली. यात एका चिमुरड्यासह 5 जणांचा जळून जागीच कोळसा झाला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस विजपुरा कडून बंगळुरूकडे जात होती. अपघात झाला तेव्हा सर्व प्रवासी झोपेत होते. आग कोणत्या कारणाने लागली याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.