
नाशिक जिल्ह्यात मार्चअखेरपासून आजपर्यंत 21 हजार 124 कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी 15 हजार 861 जण ठणठणीत बरे झाले आहेत. जिल्ह्यातील हे कोरोनामुक्तीचे प्रमाण 75 टक्के आहे. जिल्ह्यात सध्या 4 हजार 631 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 15 हजार 861 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या 4 हजार 631 इतके अॅक्टिव्ह रूग्ण आहेत, तर 632 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा रूग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी अनंत पवार यांनी दिली.
अॅक्टिव्ह रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे :
नाशिक महापालिका – 3,194; मालेगाव महापालिका – 392; नाशिक तालुका – 289; चांदवड – 41; सिन्नर – 227; दिंडोरी – 46; निफाड – 202; देवळा – 35; नांदगाव – 74; येवला – 8; त्र्यंबकेश्वर – 7; सुरगाणा – 10; कळवण – 4; सटाणा- 65; इगतपुरी – 29; मालेगाव तालुका – 99; जिल्ह्याबाहेरील -9 (एकूण – 4,631).



























































