
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेले गणेशभक्त आणि मूर्तिकारांना दिलासा देण्यासाठी शिवसेना विलेपार्ले विभागाच्या वतीने ‘वाजवी दरात, बाप्पा आपल्या घरात!’ असा अभिनक उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये पेण, खोपोलीच्या इकोप्रेंडली गणेशमूर्ती अत्यंत माफक दरात गणेशभक्तांना देण्यात येत आहेत.
लॉकडाऊनमुळे मागणी घटल्याने पेणसारख्या अनेक भागातील मूर्तीकारांच्या व्यवसायाकर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशभक्तांना घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाजवी दरात गणेशमूर्ती देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एक ते चार फुटांपर्यंतची मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पेण आणि खोपोलीतून या मूर्ती आणल्या गेल्या आहेत. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मूर्तीकारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. विलेपार्ले, अंधेरी विभागातील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. हा उपक्रम यशस्की करण्यासाठी विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, अनिल खांडेकर, अमित जोशी, जितेंद्र शिर्के, रवींद्र घाडीगावकर, किसन पोटेकर, राजेश रोकडे, संतोष ताम्हणकर परिश्रम घेत आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेने केले आहे.



























































