संपूर्ण लॉकडाऊन हटविण्याची घाई नाही! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात कोरोनाची पहिलीच लाट आहे. कोणत्याही परिस्थितीत दुसरी लाट येऊ द्यायची नाही. दुसरी लाट कंबरडे मोडणारी असून ही लाट कशी थोपवायची याची आपली तयारीही सुरू आहे. शाळा किंवा कार्यालये पूर्णतः सुरू करून कोरोनाचा संसर्ग वाढला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. तेव्हा संपूर्ण लॉकडाऊन हटवण्याची काहीही घाई नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत शनिवारी बैठक घेतली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत मत मांडताना सांगितले की, ज्या ठिकाणी लॉकडाऊन उठवण्याची घाई झाली आहे. तिथे पुन्हा लॉकडाऊन केला पाहिजे. कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीबांना बसला हे मी जाणून आहे. जर शाळा सुरू झाल्यावर शाळेत कोरोनाचा संसर्ग फेलावला किंवा कार्यालये पूर्णपणे उघडल्यानंतर त्यात कोरोनाचा संसर्ग वाढला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी आपण मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्या टप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करीत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मास्क हा शरीराचा अवयव व्हायला हवा!

कोरोनाची साथ कधी जाइल याचा अंदाज बांधता येऊ शकत नाही. जरी व्हॅक्सिन उपलब्ध झालं तरी ते सर्वापर्यंत कधी पोहोचेल, त्यासाठी कोणता कार्यक्रम हाती घेतला जाईल हेही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे स्कसंरक्षण म्हणजे स्कतःचे संरक्षण हाच आपल्याकडे एक उपाय आहे. यासाठी ज्याप्रमाणे मोबाईल आपल्या शरीराचा अविभाज्य घटक झाला आहे. त्याप्रमाणेच मास्क हाही शरीराचा एक अवयव व्हायला हवा. सोशल डिस्टन्सिंग अंगवळणी पडायला हवं. सर्व जनता खांद्याला खांदा लावून लढय़ात उतरत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला जिंकता येणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

कोरानानंतरचे उपचार महत्त्वाचे

कोरोनावर उपचार केल्यानंतर आपण रुग्णांना घरी पाठवत आहोत. पण कोरोनामुळे काहींची फुप्फुसे कमकुवत होत आहेत. त्याचप्रमाणे औषधांमुळे काहींच्या किडनी तसेच अन्य अवयकांवर परिणाम होत आहे. अशा कोरोनात बरे झालेल्या रुग्णांना कोरोनानंतरही उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी टास्क फोर्सने पावले उचालयाला हवीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

दुर्गम भागातील रुग्णांवर सॅटेलाइटच्या माध्यमातून डॉक्टर उपचार करणार

दुर्गम भागात अद्यापही फोन तसेच अन्य सेवा पोहोचलेल्या नाहीत. अशा भागातही सॅटेलाइटद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार देण्याचा शिवआरोग्य योजनेच्या माध्यमातून संकल्प सोडला होता. हा संकल्प या पुढील काळात पूर्ण करणार असून दुर्गम भागातही शहरी भागातील सुविधा पोहोचतील यासाठी पुढील पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री याकेळी म्हणाले.

साथरोगावर स्वतंत्र रुग्णालय, विषाणूवर संशोधन

कोरोनासारखा पुन्हा कुठला विषाणू आला तर त्यावरही संशोधन होणं महत्त्काचं आहे. यासाठी व्हायरॉलॉजी, इम्युनॉलॉजी लॅब सुरू करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे भविष्यातही अशी साथ येऊ शकते यासाठी अशा साथरोगासाठी रुग्णालय ऐनवेळी उभारता येईल अशी नेस्को एक्झिबिशन सेंटरच्या धर्तीवर व्यवस्था उभारण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. कोरोनासारख्या विषाणूंवर सतत संशोधन करता येईल यासाठी संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

जगाच्या पाठीवरील सर्व औषधे महाराष्ट्रात उपलब्ध केल्याबद्दल डॉक्टरांकडून आभार

कोरानावर उपचारासाठी कापरण्यात येणारी रेमडेसिविरसह अन्य सर्व जगाच्या पाठीवर उपलब्ध होणारी औषधे कोराना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल टास्कफोर्समधील डॉक्टरांकडून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यात आले. कोरोनाविरोधातील लढय़ासाठी मुख्यमंत्री 24 तास सतर्व राहून प्रशासन तसेच आरोग्य सुविधा यांचा मेळ घालत आहेत. सतत तज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात राहून आरोग्य विषयक समस्या सोडवत आहेत, याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत, अशा शब्दांत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

कोरोना कोणालाही होऊ शकतो

कोरोनाची लागण फक्त ज्येष्ठ नागरिकांना होते. लहान मुलांना होत नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर 97 हजार मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोरोना कोणालाही होऊ शकतो. सहा महिन्यांच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.