
मुसळधार पावसाचा धिंगाणा सुरूच असल्याने पृष्णा, पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोयनासह वारणा, धोम, कन्हेरे, राधानगरी धरणांमधून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली जिह्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच आता पुराचा विळखा पडण्याची भीती आहे.
कोल्हापूर जिह्यात आठवडय़ानंतर पुन्हा एकदा महापुराचे संकट उभे राहिले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. सोमवारी दुपारी बारा वाजता पंचगंगा नदीची पाणीपातळी 37.7 फूट होती. सायंकाळी 7 वाजता 38.09 फुटांवर गेली. मुसळधार पाऊस आणि धरणातून विसर्ग सुरूच राहिल्यास पंचगंगा नदी 43 फुटांची धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापुरात गेल्या सात दिवसांपासून रोज कोरोनाचे 500 ते 550 रुग्ण आढळत आहेत. रविवारी 17 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग वाढत असतानाच पुराचा धोका वाढत आहे.
पृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिर दुसऱयांदा पाण्याखाली गेली आहे. पाऊस आणि धरणातील विसर्ग वाढल्यास शिरोळ तालुक्यातील 20-25 गावांना पुराचा धोका आहे. या गावांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येते आहे. कोरोनाचा संसर्ग आणि पुराचा विळखा वाढण्याची भिती आहे.
- ऐतिहासिक राधानगरी धरण शंभर टक्के भरले असून, 7112 क्युसेक विसर्ग सुरु आहे. दुधगंगा धरणातून 12950, वारणा 14486, तुळगी 884 क्युसेक विसर्ग सुरु आहे.सांगलीत पुराच्या भीतीने अस्वस्थता
- गेल्या वर्षीच्या महापुरामुळे सांगलीतील जनतेमध्ये भिती कायम आहे. यावर्षी जिल्हा प्रशासन अधिक सतर्प आहे. नदीकाठच्या नागरिकांना युद्धपातळीवर सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.
- सांगलीत पृष्णा नदीची पाणीपातळी तीस फुटावर गेल्यानंतर शहरानजीकच्या नागरी वसाहतीत पाणी घुसते, याबाबत सांगली महापालिकेने नागरिकांना सतर्पतेचा इशारा देत त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी अनेक शाळा ताब्यात घेतल्या आहेत. सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड ,काका नगर, शिव मंदिर परिसर, इनामदार प्लॉट आदी परिसरात पाणी घुसले आहे. त्यामुळे शेकडो पुटुंबियांना स्थलांतर करावं लागले आहे.
पानशेत धरण 100 टक्के भरले
शहराला पाणीपुरवठा करणाऱया खडकवासला धरण साखळीतील पानशेत धरण आज सायंकाळी 100 टक्के भरले. त्यानंतर धरणातून दोन हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे सरासरी 88.57 टक्के भरली आहेत. पानशेत सायंकाळी 100 टक्के भरले.





























































