
कोल्हापुरात गेल्या पाच-सहा दिवसांपासुन पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यान दररोज आढळणार्या कोरोना रूग्णांमध्ये आज घट झाली आहे. असे असले तरी सामुहिक संसर्गांचा धोका कायम आहे. सोमवारी सायंकाळी 5 ते आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासांत 406 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जिल्ह्यात आजअखेर एकूण बाधीतांची संख्या 15 हजार 679 झाली असुन कोरोनामुक्त झालेल्या 484 जणांना दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे.
आता पर्यंत एकूण 8 हजार 80 कोरोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांत 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 439 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात एकूण 7 हजार 169 पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.























































