आणखी एका कलाकाराची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माटुंगा येथील रामचंद्र ऊर्फ रामइंद्रनिल कामत या कलाकाराने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कामत हे प्रसिद्ध ग्लास पेंटर होते. त्यांनी मृत्युपूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे.

कामत हे माटुंग्याच्या शंकर मठ्ठम मार्गावरील पलाई हाऊस या इमातीत राहत होते. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराम कामत त्यांच्या फ्लॅटच्या बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेले सापडले. हि माहिती मिळताच माटूंगा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कामत यांना शीव रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी कामत यांना दाखल करण्याआधी मृत घोषित केले. कामत यांनी लिहलेली सुसाईट नोट पोलिसांना मिलाली असून माटुंगा पोलिस अधिक तपास करीत आहेत. बुधवारीच शहरात अन्य तीन ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या.