
बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला लागल्याने सरकारी दवाखान्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी इतर जिल्ह्यात जात होते. हे रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार,आरोग्य अधिकारी डॉ बी आर पवार आणि जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ अशोक थोरात यांनी सर्व बाबी तपासून लोटस रुग्णालयाला कोविड सेंटर म्हणून मान्यता दिली होती. इथून आतापर्यंत येथून 16 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. डॉ अमित काळे,डॉ आशीष गर्जे, डॉ श्रीनिवास शेळके यांच्या टीमने हे यश मिळवले आहे. आतापर्यत इथे 54 रुग्ण येथे दाखल झाले होते, ज्यात एका 6 महिन्यांच्या गर्भवती महिलेचाही समावेश होता. ही महिलाही कोरोनामुक्त झाली आहे.



























































