
गेल्या काही वर्षांपासून लोकसंख्येचा वाढत असलेला आलेख येत्या काळात आणखीन वाढणार आहे. मात्र ज्या वेगाने ही लोकसंख्या वाढत आहे. त्याला मात्र खीळ बसणार आहे. 2036 पर्यंत हिंदुस्थानाची लोखसंख्या 152 कोटींच्या घरात जाणार असल्याचा अंदाज राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाकडून वर्तविण्यात आला आहे. हा अंदाज वर्तविताना देशात येत्या काळात मुलींची संख्या वाढणार असल्याचे भाकित देखील वर्तविले आहे. तर दक्षिण हिंदुस्थानाच्या तुलनेत उत्तर हिंदुस्थानात लोकसंख्या वाढीचा दर हा 30 टक्के राहणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या या अहवालानुसार 2011 मध्ये देशाच्या ग्रामीण भागाची एकूण लोकसंख्या ही 69 टक्के इतकी होती. हा दर 2036 मध्ये 61 टक्क्यांवर जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. तर शहरी भागांची लोकसंख्या 2011 मध्ये 31 टक्के इतकी होती. ही लोकसंख्या 2036 मध्ये 39 टक्क्यांच्या घरात पोहचेल, असे यावेळी सांगण्यात आले आहे.
- आयोगाने या अहवालात मुलींच्या जन्म दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.
- 2011 च्या अहवालानुसार प्रत्येक 1000 मुलांमध्ये मुलींच्या जन्म दराचे प्रमाण 957 इतके होते. हे प्रमाण 2036 मध्ये काढून 957 इतके होईल.
- गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरित असलेल्या बालमृत्यूच्या दरात ही सुधारणा होणार असल्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला आहे. 2031 ते 2035 पर्यंत बालमृत्यूचा दर 30 कर राहण्याचा अंदाज या अहवालात वर्तविण्यात आले आहे.
- या अहवालानुसार हिंदुस्थानाची लोकसंख्या 16 कर्षानंतर म्हणजेच 2036 मध्ये 25 टक्क्यांनी वाढून 152 कोटींकर पोहचणार असल्यचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- या अहवालानुसर 2011 ते 2021 च्या दरम्यान लोकसंख्या वाढीचा दर 12.5 टक्के इतका होता. आता 2021 ते 2036 च्या दरम्यान हा दर 8 टक्क्यांकर मर्यादित राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.























































