
राज्यात गेल्या 24 तासांत 8 हजार 157 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. तर दिवसभरात एकूण 10 हजार 441 रुग्णांची नोंद करण्यात आली असून राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा आता 6 लाख 82 हजार 383 वर पोहचला आहे. दरम्यान, आज कोरोनामुळे 258 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 82 हजार 383 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 22 हजार 253 इतका नोंदविण्यात आला आहे. रविवारी 8 हजार 157 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 88 हजार 271 इतकी आहे. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 71 हजार 542 जणांवर कोरोनावर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण 36 लाख 16 हजार 704 कोरोनाच्या चाचणी करण्यात आल्या आहेत.
34 जणांचा मृत्यू, 690 कोरोनामुक्त, मुंबईत दिवसभरात 991 नवे रुग्ण
मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 991 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 34 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 690 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 1 लाख 10,059 वर पोहोचली आहे. मुंबईत 34 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 419 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 18 हजार 565 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 7 लाख 04 हजार 314 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 36,348 वर पोहोचली आहे.




























































