रिक्षातून गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 4 लाखांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्षातून गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाने अटक केले. त्यांच्याकडून 4 किलो गांजा, दोन मोबाईल, रिक्षा, रोकड मिळून चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. नामदेव नारायण लंगे (वय 63, रा.केशवनगर मुंढवा) आणि मावत रूपसिंग परदेशी (वय 28, रा. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाकडून विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमंली पदार्थांची माहिती काढण्यात येत होती. त्यावेळी महालक्ष्मी लॉन्सजवळ रिक्षातून दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस नाईक मंगेश पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून नामदेव आणि मावतला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 4 किलो गांजा, दोन मोबाईल मिळून आले. चौकशीत त्यांनी गांजाव्रिकीसाठी आल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह , सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, अमोल पिलाणे, रमेश गरुड, विजय गुरव, मंगेश पवार, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.