सिगारेट आणून न देणाऱ्या तरुणाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिगारेट विकत आणून दिली नाही म्हणून दोघांनी मिळून केलेल्या मारहाणीत एका तरूणाची हत्या झाल्याची घटना घाटकोपर येथे घडली. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. घाटकोपरच्या कामराज नगरात हत्येची घटना घडली. त्याच परिसरात राहणाऱ्या योगेश गरूड (24) याला तिघांनी सिगारेट आणून देण्यास सांगितली. पण योगेशने सिगारेट देण्यास नकार देताच आकाश, अविनाश यांनी वाद घालत योगेशला लाथ्था बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या योगेशला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याला दाखल करण्यापुर्वी डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.