डिलीवरी बॉयकडून दोन किलो गांजा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन खाद्यपदार्थ पोहचविणार्‍या डिलीवरी बॉयकडून विश्रांतवाडी पोलिसांनी दोन किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

सागर दिलीप पवार (वय 20 रा. वाघेश्वरनगर, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या डिलीवरी बॉयचे नाव आहे. त्याच्याकडून 40 हजारांचा 2 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई विश्रांतवाडी येथील एअरपोर्ट रोडवर करण्यात आली.

सागर आणि त्याचा मित्र गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसानी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 किलो गांजा आणि दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान नरळे यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.