ओटीटीवर जबरदस्त टक्कर, ‘सडक 2’ आणि ‘आश्रम’, ‘मसाबा’ प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे थिएटर्स बंद असले तरी प्रेक्षकांना नव्या सिनेमांचा आणि वेबसीरिजचा आनंद घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेता येत आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी नव्या सिनेमांची टक्कर थिएटरमध्ये असायची, तशीच टक्कर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसू लागली आहे. ओटीटीकर शुक्रवारी, 28 ऑगस्ट रोजी बहुचर्चित कलाकृती प्रदर्शित झाल्या आहेत. यामध्ये ‘सडक 2’ पासून ‘आश्रम’ वेबसीरिजचा समावेश असल्याने रसिकांसाठी ही पर्कणी ठरणार आहे.

अभिनेता बॉबी देओलची ‘आश्रम’ वेबसीरिज शुक्रकारी प्रदर्शित झाली. डिस्ने हॉटस्टारवर आलिया भटचा ‘सडक 2’ सिनेमाही प्रदर्शित झालाय. त्याचवेळी नेटफ्लिक्सवर नीना गुप्ताची ‘मसाबा मसाबा’ वेबसीरीज लाँच झाली आहे. ‘सडक 2’ हा 1991 साली प्रदर्शित झालेल्या संजय दत्त आणि पूजा भटच्या ‘सडक’ सिनेमाचा सिक्केल आहे. आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्या ‘सडक 2’ मध्ये प्रमुख भूमिका आहेत. दुसरीकडे प्रकाश झा यांच्या बहुचर्चित ‘आश्रम’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असला तरी प्रत्यक्षात ही वेबसीरिज प्रेक्षकांना किती पसंत पडतेय हे लवकरच समजेल. ‘आश्रम’ मध्ये बॉबी देओल, अनुप्रिया गोएंका, आदिती पोहनकर, त्रिधा चौधरी, चंदन रॉय, सान्याल, दर्शन कुमार यासारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘मसाबा मसाबा’ वेबसीरीजमधून नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय.