ज्यांनी पाळले, मोठे केले त्यालाच सिंहिणीने ठार केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुकी जनावरे त्यांच्यावर उपकार करणाऱयांना विसरत नाहीत असे म्हटले जाते. पण दक्षिण आप्रिकेतील लिम्पोपो प्रांतात ज्याने प्रेमाने लहानपणापासून लाडाने वाढवले त्या मालकावरच हल्ला करून पांढऱया सिंहिणीने त्याला ठार केल्याची घटना घडली आहे.

69 वर्षीय वेस्ट मॅथ्यूसन हे सिंहाच्या संरक्षण आणि संवर्धन कार्यासाठी दक्षिण आप्रिकेत ‘अंकल वेस्ट’ परिचित आहेत. त्यांनी छोटी छावी असलेल्या पांढऱ्या सिंहिणीला अतिशय लाडाने वाढवले होते. आपल्या ‘लॉयन ट्री टॉप लॉज’या लायन सफरीत वेस्ट या सिंहिणीसोबत रोज 3 तास खेळायचे. पण एके दिवशी या सिंहीणीची दुसऱ्या सिंहिणीसोबत झुंज झाली. त्यानंतर तिने थेट आपले पालनकर्ता मॅथ्यूसन यांच्यावरचा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचारासाठी नेईपर्यंत त्यांचे निधन झाले. पिसाळलेल्या दोन पांढऱ्या सिंहिणींना अखेर बेशुद्ध करून दुसऱ्या लॉजमध्ये हलवण्यात आले आहे.