
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीची आज सात तास चौकशी केली. चौकशी संपल्यानंतर रात्री पोलीस संरक्षणात रियाला सांताक्रूझ येथील घरी सोडण्यात आले.
दिल्लीहून मुंबईत चौकशीसाठी आलेल्या सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी रिया चक्रवर्तीची 10 तास चौकशी केली होती. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांनी रियाला सुशांत आणि तिच्यात मैत्रीची सुरुवात झाल्यापासून युरोप टूर बाबत प्रश्न विचारले. मात्र त्यावर सीबीआयचे समाधान झालेले नाही. त्यामुळे सीबीआयने रियाला सलग दुसऱया दिवशी चौकशीसाठी बोलावले. आज तिला आर्थिक व्यवहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले. काही प्रश्नांना रियाने उत्तरे दिली. रात्री आठ वाजता रिया गेस्ट हाऊसमधून बाहेर पडली. दरम्यान, सीबीआयने मुंबई पोलिसांना विनंती केल्याने रिया आणि तिच्या कुटुंबीयाना पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे
























































