
वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एकाकडून 15 हजार रुपयांची लाच घेताऱ्या शिरूर तालुक्यातील एका मंडल अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यामुळे शिरूर परिसरात खळबळ उडाली आहे.
अमोल निवृत्तीनाथ जाधव (वय 40) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव हे शिरूर तालुक्यातील पाबळ विभागाचे मंडल अधिकारी आहेत. त्यांनी तक्रारदार यांना वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दुपारी जाधव यांनी तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.



























































