मुलाच्या खेळणीमुळे वाचले कोमात गेलेल्या आईचे प्राण! पोलिसांनी केले मुलाचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलाच्या खेळणीमुळे कोमात गेलेल्या आईचे प्राण वाचल्याची घटना लंडनमधील टेलफोर्ड येथे घडली आहे. पाच वर्षीय मुलाच्या या सतर्कतेचे पोलिसांनीदेखील कौतुक केले आहे. झाले असे की, पाच वर्षांचा जॉश चॅपमॅन हा आपल्या मोठय़ा भावासोबत घरात खेळत होता. याच दरम्यान त्याची आई जमिनीवर बेशुद्ध पडल्याचे त्याने पाहिले. क्षणाचाही विलंब न करता त्याने खेळण्यातील अँब्युलन्सवर दिसणारा 112 हा इमर्जन्सी क्रमांक डायल केला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. ती महिला डायबेटीक कोमात गेल्याचे पोलिसांना समजले. थोडा आणखी विलंब झाला असता तर कदाचित त्या महिलेचा मृत्यू होण्याची शक्यता होती. मात्र मुलाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्याच्या आईचे प्राण वाचल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.