
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. नांदेड जिल्ह्यात शनिवारी 370 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8582 एवढी झाली आहे. तसेच कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 258 एवढी झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात प्रकाशनगर नांदेड येथील 58 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 258 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील 1625 रुग्णांचे अहवाल तपासण्यात आले. त्यापैकी 1223 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शनिवारी 370 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 8582 वर पोहचली आहे. शनिवारी आलेल्या 370 कोरोना पॉझिटिव्ह अहवालामध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील 162, बिलोली 8, भोकर 4, नायगाव 25, माहूर 4, धर्माबाद 9, लोहा 5, नांदेड ग्रामीण 19, अर्धापूर 9, देगलूर 19, मुखेड 36, कंधार 12, हिमायतनगर 1, यवतमाळ 5, किनवट 4, हिंगोली 3, नगर 1, बासर 1, लातूर 1, उमरी 30, मुदखेड 7, हदगाव 8 येथील रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी 242 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 5445 एवढी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2827 एवढी झाली असून त्यापैकी 292 रुग्ण गंभीर आहेत.





























































