
परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे 89 रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी शहरात 51 व्यक्ती, ग्रामीण सहा, पूर्णा शहर व ग्रामीण प्रत्येकी एक, मानवत शहर एक व ग्रामीण दोन, गंगाखेड शहरात तीन, ग्रामीण सहा, जिंतूर शहरात नऊ, ग्रामीण तीन, पालम ग्रामीण दोन, सेलू शहरात एक, सोनपेठ शहरात दोन व पाथरी ग्रामीणमध्ये एक असे एकूण 54 पुरूष, 35 महिला असे एकूण 89 व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. परभणी शहरातील रहीम नगर भागातील 75 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.























































