
शासकीय वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) गटनेते वसंत मोरे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जानवी केळकर यांनी त्यांना जामीन मंजूर केला.
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराला घेऊन जाण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मोरे यांनी सोमवारी (7 सप्टेंबर) वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन उदास यांच्या शासकीय गाडीच्या काचा फोडल्या होत्या. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात हा सर्व प्रकार घडला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनीषा झेंडे यांनी फिर्याद दिली होती. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि बेकायदेशीर जमाव केल्याच्या कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.


























































