दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आईची आत्महत्या, कारण अस्पष्ट..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राजस्थानमध्ये एका महिलेने आपल्या तीन मुलींसोबत विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शारदा देवी असं या मृत महिलेचे नाव असल्याचे समजते आहे. या घटनेत आईसह तिन्ही मुलींचा मुत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा पती प्रवीण चेन्नई येथे कामाला आहे. महिला गावात आपल्या तीन मुलींसोबत राहत होती. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ही महिला आपल्या तीन मुलींसह चारा घेण्यासाठी जंगलात गेली होती. तिथे तिने मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी माहिती देताना रूपवास पोलीस स्टेशनचे प्रभारी हुकुम सिंह यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी महिलेचे व तिन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिस अनेक अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. गावातील काही लोकांचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, महिलेने मुलींसोबत आत्महत्या का केली? हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे.