राममंदिर ट्रस्टच्या खात्यातून चोरीला गेलेले 6 लाख रुपये एसबीआयकडून परत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट चेकद्वारे राममंदिर ट्रस्टच्या खात्यातून चोरीला गेलेले 6 लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून परत करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर मंदिर ट्रस्टने चेकच्या माध्यमातून कोणतेही व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अयोध्येत पार पडलेल्या राममंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानंतर भाविकांनी मोठय़ा प्रमाणात देणग्या देण्यास सुरुवात केली आहे. या देणग्या स्वीकारण्यासाठी उघडण्यात आलेल्या ट्रस्टच्या बँक खात्यातून काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी बनावट चेकद्वारे 3.5 आणि 2.5 लाख रुपये लंपास केले होते. लखनौमधील दोन बँकांमध्ये बनावट चेकचा वापर करून ही रक्कम काढण्यात आला होती.

तिसऱया वेळेस वाढण्यात येत असलेली रक्कम मोठी असल्याने बँक कर्मचाऱयांनी ट्रस्टचे महासचिक चंपत राय यांच्याकडे मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केल्यावर हा प्रकार उघडकीस आला होता. ही स्टेट बँकेची चूक आहे. त्यामुळे हे पैसे परत मिळावे000त अशी मागणी राममंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी केली होती. अखेर स्टेट बँकेने ही 6 लाख रुपयांची रक्कम राममंदिर ट्रस्टच्या खात्यात पुन्हा वळती केली. यानंतर ट्रस्टकडून स्टेट बँकेचे आभार मानण्यात आले आहेत