
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे हिंदुस्थानी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र या स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची पोचपावती हिंदुस्थानी संघाला आयसीसीच्या टी-20 रँकिंगद्वारे मिळाली आहे. हिंदुस्थानी संघ तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने या रँकिंगमध्ये पहिले स्थान कायम ठेवले असून इंग्लंडचा संघ दुसऱया स्थानावर विराजमान आहे.
वन डेत दुसऱया स्थानावर
हिंदुस्थानी महिला संघाने गेल्या काही काळामध्ये वन डे क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केलीय. त्यामुळे वन डेमध्ये हा संघ दुसऱया स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया टी-20 प्रमाणे वन डेतही पहिल्या स्थानावर आहे हे विशेष. वन डे रँकिंगमध्ये इंग्लंडचा संघ तिसऱया स्थानावर आहे.
आयसीसी टी-20 रँकिंग
1) ऑस्ट्रेलिया – 291 रेटिंग
2) इंग्लंड – 280 रेटिंग
3) हिंदुस्थान – 270 रेटिंग
4) न्यूझीलंड – 269 रेटिंग
5) द. आप्रैका – 249 रेटिंग
आयसीसी वन डे रँकिंग
1) ऑस्ट्रेलिया – 160 रेटिंग
2) हिंदुस्थान – 121 रेटिंग
3) इंग्लंड – 119 रेटिंग
4) द. आफ्रिका – 107 रेटिंग
5) न्यूझीलंड – 94 रेटिंग























































