आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग, सट्टेबाजांनी खेळाडूशी फिक्सिंगसाठी संपर्क साधला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमध्ये पुन्हा एकदा फिक्सिंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका संघातील क्रिकेटपटूशी सट्टेबाज, फिक्सिंगसंबंधित व्यक्तीने संपर्क साधला असल्याची माहिती बीसीसीआयच्या अॅण्टी करप्शन युनिटचे प्रमुख अजित सिंग यांनी यावेळी दिली. 2013 सालानंतर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये फिक्सिंगने डोके वर काढले आहे.

सध्या युएईमध्ये आयपीएल सुरू आहे. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ, अधिकारी यांच्यासाठी ‘बायो बबल’ तयार करण्यात आले आहे. मात्र कडक सुरक्षा व्यवस्थेतही बुकीने आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र ज्या खेळाडूशी संपर्क साधण्यात आला आहे त्याचे नाव प्रोटोकॉलनुसार गुपित ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी बीसीसीआयच्या अधिकाऱयाकडून सांगण्यात आले की, बुकीने खेळाडूशी संपर्प साधल्यानंतर त्या खेळाडूने थेट अॅण्टी करप्शन युनिटशी संपर्प साधला. ही सर्वात महत्त्वाची बाब ठरली. आता त्या बुकीचा शोध घेण्यात येत आहे. सध्याच्या काळात ऑनलाइन सोशल साइटद्वारा खेळाडूंशी संपर्प साधता येत आहे याकडे अॅण्टी करप्शन युनिट गांभीर्याने लक्ष देत आहे.