Video – पंचगंगा नदित चालकासह कार वाहून गेली, पाहा थरारक व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यातुन पडुन चारचाकी गाडी वाहुन गेल्याची विचित्र घटना समोर आली आहे.सुदैवाने पाण्याच्या प्रवाहातुन वाहत्या गाडीतुन चालक पोहत बाहेर आला. शिवाजी पेठ परिसरातील अक्षय भोसले असे या बचावलेल्या तरुण चालकाचे नाव असून,वाहनात त्याचा मोबाईलही राहिला.यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी तो निघून गेला.

दरम्यान बंधा-यावरील खराब रस्त्यांमुळे हि गाडी पाण्यात पडली असावी असे स्थानिक नागरिकां कडून सांगण्यात येत होते. आज दुपारी अडीचच्या सुमारास हि घटना घडली.बंधा-यावरुन जाताना हि चारचाकी अचानक नदीत पडली.सुदैवाने पाण्याची पातळी कमी असल्याने,चालक तरुण पोहत काठावर आला.यावेळी काही स्थानिक तरुणही बचावा साठी पुढे आले होते.वाहनाच्या आडवे कोण तरी आल्यासारखे झाल्याने,ताबा सुटल्याचे चालक अक्षय कडुन सांगण्यात येत होते.तर अतिवृष्टी आणि महापुरामुळे यंदाही या बंधा-यावरील काॅंक्रीट वाहुन गेल्याने,रस्ता अत्यंत खराब झाला आहे.त्यामुळेच हि गाडी नदीत पडली असावी असे स्थानिकांनी सांगितले.