
हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले पुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यास पाकिस्तानी वकिलांनी नकार दिला आहे. जाधव यांच्या वतीने खटला लढण्यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने वकिलांची निवड केली होती, मात्र जाधव यांचा खटला लढण्यासाठी हिंदुस्थानी वकिलांचा समावेश करण्यास पाकिस्तान सरकारने यापूर्वीच नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तानची ही नवी खेळी आहे का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या खोटय़ा प्रकरणात जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानचे दोन वरिष्ठ वकील अबिद हसन मिंटो आणि मखदुम अली खान यांची मदत मागितली. या दोघांनीही पुलभूषण जाधव यांच्या वतीने न्यायालयात हजर होण्यास नकार दिला आहे. त्यांनी आपल्या निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाच्या पुलसचिव कार्यालयाला कळविले आहे. अबिद हसन मिंटो म्हणाले की, आपण सेवानिवृत्त झालो असून यापुढे
क्विन्स काऊन्सलर देण्यास नकार
पुलभूषण जाधव प्रकरणात हिंदुस्थानी वकील किंवा क्विन्स काऊन्सलर नेमण्याची हिंदुस्थानची मागणी पाकिस्तानने यापूर्वीच फेटाळली आहे. क्विन्स काऊन्सलर हा एक असा बॅरिस्टर पिंवा अधिवक्ता असतो ज्याला लॉर्ड चँसलरच्या शिफारशीनुसार ब्रिटिश महाराणीसाठी नियुक्त केले जाते. याबाबत बोलताना पाकिस्तानने म्हटले आहे की, ज्या न्यायाधीशांकडे पाकिस्तानी न्यायालयात वकिली करण्याचा परवाना आहे अशांनाच पाकिस्तानी न्यायालयात हजर राहण्याची परवानगी देण्यात आल्याचे हिंदुस्थानला कळवले आहे. त्यामुळे या परिस्थितीत आता कोणताही बदल करता येणार नाही.
आयसीजेच्या सूचनेवरून पाकिस्तानने आणला अध्यादेश
तत्पूर्वी पाकिस्तानच्या संसदेने जो अध्यादेश चार महिन्यांसाठी वाढविला होता त्या अध्यादेशाअंतर्गत जाधव यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशावरून हा अध्यादेश पाकिस्तानने आणला होता. जाधव यांच्यापर्यंत राजनैतिक मदत पोहचविण्यास मनाई करण्यात आल्यानंतर हिंदुस्थानने 2017 मध्ये पाकिस्तानच्या विरोधात आईसीजेचे लक्ष वेधले आणि एका लष्करी न्यायालयातर्फे हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली एप्रिल 2017 मध्ये सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले.




























































