लो चली मैं… माधुरी, रेणुकाचा बेधुंद डान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

26 वर्षांपूर्वी ’हम आपके हैं कौन’ या सिनेमात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे या दोघींनी बहिणींची भूमिका साकारली होती. दोघींचे ‘लो चली मैं… हे गीत खूपच हिट झाले होते. या गाण्यात ‘देवर की बारात’ घेऊन निघालेली रेणुका आणि तिच्या तालावर ठेका धरणारी माधुरी, प्रेक्षक विसरू शकत नाही. रेणुका- माधुरी जोडीचा हा जलवा आज वेगळ्या ढंगात चाहत्यांना बघायला मिळाला. निमित्त होतं रेणुका शहाणे यांच्या वाढदिवसाचे! ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाच्या सेटवर रिक्रिएट झालेल्या याच गाण्याचा व्हिडीओ माधुरीने आज पुन्हा शेअर करत रेणुका शहाणे यांना खास शुभेच्छा दिल्या.

नव्वदच्या दशकामध्ये ‘हम आपके हैं कौन’ हा सिनेमा गाजला. या सिनेमात बहिणी झालेल्या रेणुका-माधुरी या नंतर 2018 साली ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात एकत्र आल्या. ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाच्या वेळी हे गाणं लागल्यावर त्यावर ताल धरण्यापासून माधुरी आणि रेणुका स्वतःला थांबवू शकल्या नव्हत्या. त्यावेळचा हाच व्हिडीओ माधुरीने ट्विटवर आज शेअर केला.  ‘रेणुका, तुझ्यासोबतच्या खूप साऱया अविस्मरणीय आठवणी आहेत. हम आपके है कौन ते बकेट लिस्ट..मजेशीर अनुभव. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशी पोस्ट माधुरीने लिहिली आहे.