
कोरोनाच्या महामारीमुळे अनेक स्थलांतरित कामगार आपल्या गावी निघून गेल्यामुळे देशातील रियल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका होता. अनेक बांधकामे अक्षरशः ठप्प झाली होती. अनलॉकमध्ये हळूहळू अर्थव्यवस्था पूर्ववत होत असून स्थलांतरित कामगार पुन्हा महानगरांकडे जाण्याच्या विचारात असल्याने रियल इस्टेट क्षेत्रात आशेचा किरण निर्माण
झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित कामगार गावी निघून गेल्यामुळे रियल इस्टेट क्षेत्रात कामगारांची वानवा जाणवू लागली होती. हे कामगार शहरांत कधी परतणार याविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती. याबाबत नरेडको केस्टचे अध्यक्ष आणि हाऊसिंग फॉर ऑलचे संयोजक राजन बांदेलकर म्हणाले, सुमारे 30 ते 35 टक्के स्थलांतरीत कामगार एमएमआर भागांतच होते. उर्वरीत 15 ते 20 टक्के कामगार गावांतून परतले आहेत. बांधकामांच्या ठिकाणी हे कामगार हंगामी स्वरुपात काम करतात. मान्सूनपूर्वी पिकांची लागवड करण्यासाठी ते गावाकडे परततात. दसरा किंवा दिवाळी दरम्यान हे कामगार पुन्हा बांधकामाच्या ठिकाणी परततील असे आम्हाला काटते. विकासक आणि कंत्राटदार अशा कामगारांसाठी विमान तिकिटे, खासगी बस व्यवस्था, राहण्याच्या सुविधा आणि वैद्यकीय विमा यासारख्या योजना आखत आहेत.
तर सुमीत वूड्स लिमिटेडचे संचालक भूषण नेमलेकर म्हणाले, ‘स्थलांतरीत कामगार पुन्हा परतत असल्याने लवकरच आर्थिक घडी पूर्वपदावर येईल. एखाद्या विशिष्ट संघटनेत काम करणाऱ्य़ा कामगारांना रोजगार कायमचा गमावण्याची भीती असल्याने ते तातडीने कामांवर रुजू होऊ शकतात.’
























































