
जिल्हा शासकीय रुग्णालयातील औषधसाठा भलत्याच पत्त्यावर गेल्याची खळबळजनक घटना मागील आठवड्यात घडली. कुरिअरने मागवलेला हा औषधसाठा दुसर्याच पत्त्यावर गेल्यामुळे अनेकजण अचंबीत झाले. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 4 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती या प्रकरणाचा शोध घेणार आहे. औषधसाठ्याचा हा काळाबाजारी करणाऱ्यांना लवकरच ‘डोस’ मिळणार आहे.
या औषधसाठ्याच्या बॉक्समध्ये सलाईनच्या बाटल्या होत्या. हा औषधसाठा कोणी मागवला याचा शोध सुरु झाला आहे. औषधसाठ्याच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. रत्नागिरी प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबीता कमलापूरकर, साई धुरी, लेखाधिकारी उमेश मगदूम, अन्न व औषध प्रशासनचे खापेकर यांचा या समितीत समावेश आहे.























































