उत्तर प्रदेश : तीन बहिणींवर झोपेत अॅसिड हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये तीन दलित बहिणींवर अॅसिड हल्ला झाल्याचे वृत्त आहे. घटना सोमवारी रात्री घडल्याची सांगितले जात आहे. तिन्ही बहिणी अल्पवयीन असून स्थानिक जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

तिघी बहिणी रात्री घरात झोपलेल्या असताना त्यांच्यावर अॅसिड फेकण्यात आलं. दोन बहिणींना हलक्या जखमा झाल्या मात्र एका बहिणीच्या चेहऱ्यावरच अॅसिड पडले. दरम्यान, अॅसिड हल्ल्याचे कारण अज्ञात आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.