#MumbaiPowerCut – 15 अभियंते, 27 तंत्रज्ञ आणि 52 कामगारांची जिगरबाज कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचा वीज पुरवठा सोमवारी सकाळी खंडित झाला आणि नॉर्मल मोडवर असलेली महापारेषणची यंत्रणा तत्काळ इमर्जन्सी मोडवर आली आणि सुरू झाली मिशन कनेक्टिग मुंबई. एकाच वेळी तीन वीज वाहिन्यांसह खारघर उपकेंद्रात झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी सकाळी सवा दहाच्या ठोक्याला 15 अभियंते, 27 तंत्रज्ञ आणि 52 कामगारांसह स्थानिक अधिकारी कर्मचाऱयांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम सुरू केले. सकाळची दुपार झाली, दुपारची सायंकाळ झाली तरीही प्रत्येकजण आपली तहान, भूक हरपून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत होता. त्यामुळेच आठ तासाच्या जिगरबाज कामगिरीनंतर मुंबईचा वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला.

कळवा-पडघा सर्पिट 2 मध्ये सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व भार 400 केव्हीच्या कळवा- खारघर वाहिनीवर टाकला, पण काही मिनिटातच वीज केंद्रात बिघाड होऊन वीज वाहिनीचा जम्पर तुटला. त्यामुळे संपूर्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबईचा परिसर 10 वाजून 5 मिनिटांनी अंधारात गेला. त्याची दखल घेत महापारेषणच्या देखभाल दुरुस्ती विभागाने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानुसार एक अभियंता, 6 तंत्रज्ञ आणि 12 कामगारांनी पहाटे बंद झालेले कळवा-पडघा सर्पिट 1 सकाळी सक्वा दहाच्या सुमारास सुरू केले. तर खारघर उपकेंद्रात झालेला बिघाड चार अभियंते, 6 तंत्रज्ञ आणि 10 कामगारांनी दुरुस्त करून वीज वाहिनीचा तुटलेला जम्पर बसवला. त्यामुळे 400 केव्हीची वहिनी सुरू झाल्याने बाराच्या सुमारास मुंबईत टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरू झाला. तसेच कळवा-पडघा सर्पिट 2 मध्ये बदलापूर येथे झालेला बिघाड शोधण्यासाठी मॉनिटरिंग टीमने आधी पेट्रोलिंग करून शोधला. त्यानंतर सहा अभियंते, 15 तंत्रज्ञ आणि 30 कामगारांनी युद्ध पातळीवर काम करून सायंकाळी 6 वाजता आपली मोहीम फत्ते केली. त्यानंतर सर्पिटची चाचणी करून 6 वाजून 40 मिनिटांनी वीज पुरवठा सुरू केल्याचे महापारेषणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

संयमानेच दुरुस्तीचे काम हातावेगळे केले

मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. नेमके कोणते काम आधी करायचे हे देखभाल दुरुस्ती पथकाला सुचत नव्हते. त्यातच सर्व काम जिवंत वीज वाहिन्यांच्या संपका&त येऊन करावे लागणार होते. त्यामुळे संयम आणि शांत डोके ठेवूनच काम हात वेगळे केल्याचे देखभाल दुरुस्ती पथकाचे नेतृत्व करणाऱया मुख्य अभियंत्याने सांगितले.

कळवा-तळेगाव वाहिनीच्या दुरुस्तीला आणखी दोन दिवस लागणार

मुंबईसाठी कळवा वीज केंद्रापर्यंत वीज वाहून आणण्यासाठी असलेल्या 400 केव्हीच्या चार वीज वाहिन्यांपैकी तीन वाहिन्यांचे काम पूर्ण झाल्याने मुंबईचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र कळवा-तळेगाव या वीज वाहिनीच्या दुरुस्तीसाठी 100 अधिकारी कर्मचारी काम करत आहेत. पण कानेफाटा-दहीवली येथे तांत्रिक बिघाड झालेला एक टॉवर डोंगरावर तर दुसरा टॉवर घाटाच्या खाली आहे. त्यामुळे वाहिनीच्या दुरुस्तीला आणखी दोन दिवस लागणार आहेत.