
मध्य रेल्वेने सोमवार 19 ऑक्टोबरपासून 225 अतिरिक्त फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक प्रवाशांच्या वाढती गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी मध्य रेल्वेने फेऱया वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी सुरू असलेल्या एकूण फेऱयांची संख्या आता 481 वरून 706 इतकी होणार आहे.
15 जूनपासून राज्य सरकारच्या मागणीनूसार उपनगरीय लोकलच्या फेऱया सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात वेळोवेळी टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेनेही आपल्या फेऱयांची संख्या अलिकडेच 700 इतकी केली आहे. मध्य रेल्वेच्या 700 फेऱयांमध्ये मुख्य मार्गावर 499 फेऱया चालविण्यात येणार असून त्यात 309 फेऱया धिम्या मार्गावर तर 190 फेऱया जलद मार्गावरील आहेत. तर हार्बर मार्गावर 187 फेऱया आणि ट्रान्सहार्बर मार्गावर 20 फेऱया चालविण्यात येत आहेत.



























































