
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबलेल्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
फेब्रुवारी-मार्च 2020 मधील नापास विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेतंर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसू इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 29 ऑक्टोबरपर्यत आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यत आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.


























































