पेटीएम कर्मचाऱ्याचा ऑनलाइन फ्रॉड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल इंजिनीयरिंगचा वापर करून पेटीएम बॅंकेच्या कर्मचाऱ्याने एका व्यावसायिकाची 50 हजारांची आर्थिक फसवणूक केली. मात्र महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शिताफीने तपास करून त्या झोलर कर्मचाऱ्याला पकडले.

अंधेरी परिसरातील दुग्ध व्यावसायिक मनसुख पटेल यांच्या पेटीएम खात्यातून दोन दिवसात 50 हजार 448 रुपये अज्ञात इसमाने काढून घेतले होते. याबाबत पटेल यांनी तक्रार देताच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुह्याचा तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत, उपअधीक्षक विजय खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश सरदेसाई, एपीआय शिरीष भालेराव आदिंच्या पथकाने तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला असता पेटीएम बॅंकेत फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्हचे काम करणारा मोहम्मद मुन्ना फशिउद्दीन अन्सारी (25) यानेच ते पैसे गैरमार्गाने काढून घेतल्याचे निष्पन्न झाले.