
मुंबईचा 30 वर्षीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याने बुधवारी रात्री झालेल्या आयपीएल लढतीत नाबाद 79 धावांची खेळी साकारत मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दिमाखदार विजय मिळवून दिला. या जबरदस्त खेळीनंतर सूर्यकुमार यादवचे काैतुक होऊ लागले. तसेच हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलियन दौऱयात संघात स्थान दिल्याबद्दल सीनियर निवड समितीवर टीकाही होऊ लागली. याप्रसंगी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्काॅट स्टायरीस याने सोशल साईटवर मत व्यक्त करताना म्हटले की, सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असल्यास तो परदेशात जाऊ शकतो.
विराटने डिवचले, मात्र संयम बाळगला
सूर्यपुमार यादव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत संयमी व शांतचित्ताने फलंदाजी करीत होता. त्याचे चित्त विचलित करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली त्याच्याजवळ गेला आणि त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण सूर्यकुमार यादव याने काहीही न बोलता गप्प राहणे पसंत केले. यावेळी त्याने आपली खेळी पुढे सुरूच ठेवत मुंबई इंडियन्सला दणदणीत विजय मिळवून दिला. सूर्यकुमार यादवच्या या खेळीचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनीही काैतुक केले.
पंजाब-राजस्थानमध्ये अस्तित्वाची लढाई
आयपीएलच्या गुणतालिकेत पिछाडीवर असलेल्या पिंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स य दोन संघांमध्ये शुक्रवारी (दि. 30) अस्तित्वाची लढाई रंगणार आहे. स्टार खेळाडूंनी सजलेल्या या तुल्यबळ संघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा असतील. राजस्थानचा पराभव झाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. लागोपाठ पाच लढतींपासून विजयी रथावर स्वार असलेल्या लोकेश राहुलच्या पंजाबपुढे धोकादायक राजस्थानचे कडवे आव्हान असेल. कारण मागील लढतीत मुंबई इंडियन्ससारख्या बलाढय़ संघाचा राजस्थानने धुव्वा उडविलेला आहे. त्यांचा बेन स्टोक्स त्याच्या सुपर फॉर्ममध्ये आलाय. कर्णधार स्टीव्हन स्मिथ, संजू सॅमसन, जोश बटलर, रॉबिन उथप्पा, रियान पराग व राहुल तेवतिया असे एकापेक्षा एक फलंदाज राजस्थानच्या दिमतीला आहेत. जोफ्रा आर्चरसारखा मॅचविनर गोलंदाज या संघाकडे आहे. त्यामुळे पंजाबला उद्या सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करावा लागणार आहे.

























































