
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कामराजनगरमागील पीडब्लूडी नाल्याच्या बांधकामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यामुळे रमाबाईनगर, कामराजनगर येथील पावसाळ्यात पाणी तुंबल्याने होणारी गैरसोय दूर होणार आहे.
कामराजनगरजवळ परिसरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर 15 मीटर रुंद तर 1 किमी लाबीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. 2016 पासून सीआरझेडच्या कचाटय़ात अडकलेले हे अत्यावश्यक काम महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे मार्गी लागले. या नाल्याच्या बांधकामाचा शुभारंभ विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. स्थानिक नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या पाठपुराव्याने हे काम होत आहे. या नाल्यामुळे रमाबाईनगर, कामराजनगर व आजूबाजूच्या परिसराची पावसाळ्यात पाणी तुंबल्याने होणारी गैरसोय दूर होणार आहे. यावेळी उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, शाखाप्रमुख शरद कोथेरे, नाना ताठेले, शाखा संघटक शकुंतला शिंदे व जगु घुगे, मधुकर, तिरुपती आदी उपस्थित होते.





























































