मथुरेतील नंदबाबा मंदिरात नमाज पठण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मथुरा येथील नंदगावमधल्या प्रसिद्ध मंदिरात नमाज पठण केल्यामुळे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जण नमाज पठण करत असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

मथुरा येथील नंदगाव परिसरात नंदबाबा नावाचं प्रसिद्ध मंदिर आहे. झी सलाम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथील खिदमतगार या संस्थेचे सदस्य असलेले फैसल खान आणि मोहम्मद चांद हे दोघेजण निलेश गुप्ता आणि आलोक रत्न या दोघांसमवेत नंदबाबा मंदिरात पोहोचले. तिथे त्यांनी नमाज पठण केलं.

फैसल आणि चांद यांचा नमाज पठण करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी याला विरोध केला. याप्रकरणी मंदिराचे सेवेकरी कान्हा स्वामी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरोधात 153-ए, 295, 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या कान्हा स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांसोबत स्वामी यांचं बोलणं झालं होतं. पण या दोघांनी नमाज पठणासाठी कोणताही परवानगी घेतली नव्हती. त्यांनी खोटं बोलून नमाज पठण केलं आहेस असा आरोप स्वामी यांनी केला आहे.