
आरटीआय कार्यकर्त्याची वैयक्तिक माहिती केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आज माहिती व प्रसारण मंत्रालयाला चांगलेच फैलावर घेतले. या प्रकरणाची चौकशी करा असे आदेश देत भरपाई म्हणून याचिका कर्त्याला 25 हजार देण्यास खंडपीठाने केंद्राला बजावले.
कोविडचा प्रादुर्भाव पाहता अयोध्येतील राम मंदिरच्या भूमी पूजनाचा सोहळा पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यानंतर गोखले यांना धमकीचे का@ल आणि मेसेज येऊ लागले. सप्टेंबर 2019 साली केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने गोखले यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यामुळे त्यांना असे का@ल येत असल्याचा दावा करत झालेल्या मनस्तापामुळे 50 लाखाची भरपाई मिळावी म्हणून गोखले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
याप्रकरणी केंद्र सरकारच्या वतीने माहिती देताना ?ड रुई रोड्रीग्स यांनी कोर्टाला सांगितले की सदर माहिती वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे. तसेच संबंधितांविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुद्धा हाती घेण्यात आली आहे. त्यावर हायकोर्टाने याची दखल घेत याप्रकरणाचा चौकशी अहवाल तीन महिन्यात प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब केली.



























































