वीरूसोबत लग्न करण्यासाठी अल्पवयीन ‘बसंती’ चढली होर्डिंगवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बसंतीसोबत लग्न करण्यासाठी वीरू पाण्याच्या टाकीवर चढला होता. शोलेमधील हा सीन सर्वांनाच माहित आहे. पण वीरूसोबत लग्न करण्यासाठी एक अल्पवयीन बसंती होर्डिंगवर चढली होती. कशीबशी समजूत काढून या बसंतीला खाली उतरवण्यात आले.


मध्य प्रदेशमध्ये एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रियकरासोबत लग्न करायचे होते. पण मुलीच्या आईचा या लग्नाला विरोध होता. म्हणून ही मुलगी थेट एका होर्डिंगवर चढली. नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कशीबशी समजूत घालून तिला खाली उतरवले.