नगरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरमध्ये राहाता शहरातील अस्तगाव रोड लगत असलेल्या एका शेतातील विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने, एकच खळबळ उडाली. अलका भगत असे या मृत महिलेचे नाव आहे.

परिसरातील नागरिकांनी विहिरीत तरंगणारा मृतदेह बघितल्यांनंतर नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस ठाण्याचे अधिकारी सुभाष भोये आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत, घटनेचा पंचनामा केला. त्यांनतर शव विच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अलका भगत ने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.