पुणे- कपड्यांची खरेदी पडली 1 लाख 60 हजारांना, कोंढव्यात घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीसाठी मुंबईत कपड्यांची खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबीयाच्या घरात चोरट्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांची चोरी केली. ही घटना दोन दिवसांपुर्वी कोंढवा खुर्दमधील शिवनेरीनगरमध्ये घडली. याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटुंबीयांसह कोंढव्यातील शिवनेरीनगरमध्ये राहायला आहेत. 8 नोव्हेंबरला सकाळी ते कुटुंबीयासह मुंबईला दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी गेले होते.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोकडसह 1 लाख 60 हजारांचे दागिने चोरुन नेले. मुंबईहून कपडे खरेदी करुन आल्यानंतर महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.