सेक्ससाठी दबाव टाकणाऱ्या डॉक्टरचा परिचारिकेने केला खून; मृतदेहाचे तुकडे केले अन शिजवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकणाऱ्या डॉक्टरचा परिचारिकेने खून केला. खून करूनही न भागल्याने या परिचारिकेने त्याचे तुकडे केले आणि गरमागरम पाण्यात शिजवून काढले. ली फेनपिंग असे परिचारिकेचे नाव असून लू युआनजेन असे मृत डॉक्टरचे नाव आहे. हा सर्व प्रकार चीनच्या यूलिन शहरामध्ये घडला असून या प्रकरणी परिचारिका फेनपिंग हिला मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.

चीनच्या स्थानिक वृत्तसंस्थानी दिलेल्या वृत्तानुसार, 25 वर्षीय ली फेनपिंग अतिदक्षता विभागात परिचारिका म्हणून काम करत होती. फेनपिंग हिचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. लू युआनजेन यांच्याशी लैंगिक संबंध होते. फेंगपिंग हिला पत्ते खेळण्याचे व्यसन होते आणि यात ती बराच पैसा हरली होती. त्यामुळे ती डॉक्टर लू यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेऊन होती आणि त्याचे पैसेही घेत होती.

मात्र डॉक्टर लू यांनी फेंगपिंग हिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिने रागाच्या भरात डॉक्टरचा काटा काढला. बदला घेण्यासाठी फेंगपिंगने आधी डॉ. लू यांचा खून केला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून शिजवले.

img_20201110_163125

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मृतदेहाचे अनेक तुकडे टॉयलेट फ्लॅशमध्ये देखील सापडले. फेंगपिंग हिच्या घरात पोलिसांना डॉ. लू यांचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. या प्रकरणी आरोपी फेंगपिंग हिला मृत्युदंडाची शिक्षा आणि 11 हजार पौंडचा दंड ठोठावण्यात आला आहे.