हम तो डुबे सनम, तुमको भी ले डुबे सनम; लोजपमुळे नितीश कुमार यांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीला यश मिळाले असून बहुमताचा आकडा गाठला आहे. तर दुसरीकडे लोक जनशक्ती पक्षाला अवघी एक जागा मिळाली आहे. लोजपला जरी एक जागा मिळाली आहे तरी जदयुला नुकसान पोहोचवण्यात पक्षाने कुठलीच कसर बाकी ठेवली नाही.

एनडीएला जरी बहुमत मिळाले असले तरी जदयुला 43 जागांवर विजय मिळाला आहे. लोजपने आधीच नितीश कुमार आमचे शत्रू असल्याचे जाहीर केले होते. म्हणून चिराग पासवान यांनी थेट भाजपला पाठिंबा दऊन जदयु आणि महागठबंधनविरोधात उमेदवार दिले होते. लोजपला भलेही 1 जागा मिळाली असेल पण जदयुच्या 40 जागांवर लोजपन प्रभाव पाडला आहे.

गेल्या 20 वर्षात लोजपची ही सर्वाधिक खराब कामगिरी म्हटली जाते. पक्षाचे संस्थापक राम विलास पासवान यांचे निवडणुकीपूर्वी अकाली निधन झाले. त्यामुळे बिहारची संपूर्ण जवाबदारी पासवान पुत्र चिराग पासवान यांच्यावर होती.

बिहारमध्यील 40 जागांवर लोजपमुळे जदयुला पराभव स्विकारावा लागला आहे. जर लोजप एनडीएमध्ये असती तर जदयुला इतका फटका बसला नसता असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.