कर्नाटकात भाजप आमदाराकडून स्वपक्षीय नगरसेविकेला मारहाण, मतदानापासून रोखण्याच प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमध्ये भाजप आमदर सिद्दू सावडी यांनी स्वपक्षीय नगरसेविकेला मारहाण केली आहे. इतकेच नाही तर सदर महिलेला मतदानापासून रोखले आहे. याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती. त्यासाठी भाजप नगरसेविका सविता हुरकादली, चांदनी नायक आणि गोदावरी बाट यांनी आपल्यालाही अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची संधी मिळावी अशी विनंती केली. परंतु पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांची ही विनंती अमान्य केली.

सोमवारी या अध्यक्षपदासाठी मतदान होते. तेव्हा नगरसेविका सविता हुरकादली या मतदानासाठी जात असताना भाजप आमदार सिद्दू सावडी यांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखले, इतकेच नाही तर त्यांना मारहाणसुद्ध केली. या सगळ्यात पोलीस सविता यांचे सावडी यांच्यापासून संरक्षण करत होते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्य़ात कैद झाली आणि त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या सगळ्या हाणामारीत आपण वाचलो हा चमत्कार असल्याची प्रतिक्रिया सविता हुरकादली यांनी दिली. तर दुसरीकडे आमदार सिद्दू सावडी यांनी सविता हुरकादली या काँग्रेसला मदत करत होत्य असा आरोप केला आहे. तसेच त्या दिवशी काँग्रेस नेत्यांनी महिलांशी छेडछाड करत मारहाण केली असेही आमदार सावडी म्हणाले.