
एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन चोरट्यांनी कोंढवे धावडे परिसरातील दोन एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन 83 हजार 500 रुपये काढूले आहेत. याप्रकरणी अमित अशोक कुंभार यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कोंढवे धावडे आणि एनडीए खडकवासला अकादमी सर्कलसमोरील दोन एटीएम मशीनमध्ये छेडछाड केली. त्यानंतर मशीनमधून 83 हजार 500 रूपये काढून घेत पलायन केले. याप्रकरणी उत्तमनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे तपास करीत आहेत.





















































