हिंदुस्थान-चीन सीमावाद, रशियाने केलं ‘हे’ मोठं विधान..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखमध्ये हिंदुस्थान-चीन सीमेवर सुरू असलेला संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाने मोठं विधान केलं आहे. रशियाने म्हटले आहे की, हिंदुस्थान आणि चीन सीमावाद वाढल्यास क्षेत्रीय अस्थिरता ही वाढेल. एकतर जागतिक अशांतता आणि हिंदुस्थान आणि चीनमधील सीमा ताणतणाव वाढल्यामुळे युरेशियामधील क्षेत्रीय अस्थिरता वाढेल. या दोन देशांमधील वाढत्या तणावामुळे इतर अनेक देश भौगोलिक राजकीय लाभ घेऊ शकतात, अशी भीतीही रशियाने व्यक्त केली आहे.

ऑनलाइन मीडिया ब्रीफिंगमध्ये रशियाचे उप-मिशन प्रमुख रोमन बॅबस्किन म्हणाले, दोन आशियाई शक्तींमधील वाढत्या तणावाविषयी रशिया चिंतित आहे. दोन्ही देशांमधील हा वाद मिटविण्यासाठी संवादाचा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे.

दोन्ही देशांमध्ये तणाव कमी व्हावा – रशिया

हिंदुस्थान- चीन एससीओ आणि ब्रिक्स गटाचे सदस्य आहेत. यावरून रोमन बॅबस्किन म्हणाले, बहुपक्षीय प्लॅटफॉर्मच्या चौकटीत सहयोग करण्यासाठी आदरयुक्त संवाद हे एक महत्त्वाचे साधन आहे. जागतिक अशांतता आणि हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील तणाव वाढल्यास याचा परिणाम युरेशियामधील क्षेत्रीय अस्थिरतेवरही होईल. आमच्या शेजारी देशांना आणि मैत्रीपूर्ण आशियाई देशांना संवाद साधण्यास प्रोत्साहित करणे फार महत्वाचे आहे, असे आम्हाला वाटते.